Sunday, February 22, 2015

वॅनिला फ्रेंच टोस्ट


वॅनिला फ्रेंच टोस्ट

लागणारा वेळ: 

१० मिनिटे

लागणारे जिन्नस: 

४ अंडी
१ ग्लास दुध - १५० मिली
१ चमचा साखर
चिमुटभर मीठ
५० ग्राम वॅनिला पावडर
१० ब्रेड स्लाईस - शक्यतो ताजे नकोत - १/२ दिवस फ्रिज मधे ठेवलेले उत्तम
लिंबु, हॉट सॉस्,मध, काकवी, मेपल सायरप व तत्सम टॉपिंग

क्रमवार पाककृती: 

१. अंडी फोडुन फेसुन घ्या
२. त्यात दुध, साखर, मीठ , वॅनिला पावडर एकत्र करा
३. २ मिनिटानंतर मिश्रण जर फार घट्ट वाटले तर थोडे दुध घाला मिश्रण पसरट थाळीत काढा
४. ब्रेडच्या कडा कापुन घ्या - ठेवण्यासही हरकत नाही
५. पॅनवर बटर घालुन मंद आचेवर ठेवा.
६. स्लाइसची एक बाजु मिश्रणात बुडवा व थोड्या वेळाने दुसरी
७. स्लाइस दोन्ही बाजुने परतून घ्या एकावेळी अनेक स्लाइस ठेवता येतात.
८. गरम असतानाच हव्या त्या टॉपिंग्सह खायला द्या
वॅनिला पावडर मुळे एक वेगळीच चव येते व त्यातील मेझ मुळे खुसखुशीत होतात

वाढणी/प्रमाण: 

४ जणांसाठी २/३ नग

माहितीचा स्रोत: 

वॅनीला कॉफीमेट माझे प्रिय. न मिळाल्यामुळे मी पावडर आणली त्याने फक्त माझा कॉफी मेकर जाम झाला. त्यामुळे नविन वॅनिला रेसिपी शोध.

कुह बॉम केलडेक - रताळा/याम बॉम्ब


कुह बॉम केलडेक - रताळा/याम बॉम्ब

लागणारा वेळ: 

१ तास

लागणारे जिन्नस: 

सारण:

१ कप खवलेला नारळ
साखरेचा / गुळाचा पाक चवीनुसार
५० ग्रॅ तांदळाची पिठी
केवड्याची पाने

आच्छादन

२/३ मोठी रताळी बेक करुन / मायक्रोवेव्ह करुन मॅश करावे - अजीबात उकडु नये
१०० ग्रा मैदा
१०० ग्रा तांदळाची पिठी
मिठ, तीळ इ.
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सारण
१. खवलेला नारळ , साखरेचा/गुळाचा पाक , केवडा पान एकत्र करुन एकजीव करावे
२. केवड्याची पाने काढावीत
३. पिठी पाण्यात मिसळुन गाठी होणार नाहीत हे पहावे व ती सारणात मिसळावी
४ मिश्रण शिजवुन घट्ट करुन घावे. [ साधारणतः लाडु करतो तितके]
५. चवीप्रमाणे गोड हवे असल्यास साखर्/गुळ घाला
६. मिश्रण गार होउ देत

आच्छादन

७. मैदा, पिठी आणी कुस्करलेले रताळे एकत्र करुन चांगले मळुन घ्या. हवे असल्यास थोडे पाणी घाला.
८. मळलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या.
९. गोळे हातावर दाबुन चपटे करा आणी त्यात ते सारण भरा. हे सारण जरा घट्ट असते.
१०. तेल गरम करायला ठेवा.
११. तेल गरम होइ पर्यंत सारण असलेले गोळे पाण्यात बुडवुन तीळात घोळावेत.
१२. मंद आचेवर गोळे सोनेरी तळुन घ्या. तेल जास्त तापु देउ नका. induction cooking best.
13.
खा....

वाढणी/प्रमाण: 

६/७

अधिक टिपा: 

उकडीच्या मोदकांनाही वरील आच्छादन वापरता येते. केवडा तर अप्रतीमच..

माहितीचा स्रोत: 

जोहोर बारु , मलेशिया येथे एका चाइनीज मित्राबरोबर, रेसिपी सिंगापुर मधील न्युटन सर्कल मधील हातवारे करत एका बाईकडुन.

बटाटा खेकडा भजी


बटाटा खेकडा भजी

लागणारा वेळ: 

१ तास

लागणारे जिन्नस: 

१ कि मोठे बटाटे
हिरवी मिरची , आले, कोथींबीर, लाल तिखट, मीठ
तळण्यासाठी तेल,
डाळीचे पीठ ई.
क्रमवार पाककृती: 

कांद्याची खेकडा भ़जी नेहमीच होतात. बटाटा मात्र काप भजी होतात. ह्या भज्यांना तेल जास्त लागते व ती कुरकुरीत नसतात.
बटाट्याची खेकडा भजी हा फार चांगला पर्याय आहे.
१. बटाटे सोलुन घ्यावेत.
२. वाळवणाच्या किसणीवर कीसावेत.
३. कीस पाण्यात ठेवावा. पाण्यात थोड मीठ टाकावे.
४. थोड्यावेळाने चाळणीमधुन कीस गाळुन घ्यावा. त्यात एक चमचा तेल टाकुन मिसळावे
५. कांदा भाजी सारखेच पीठ करावे.
६. पीठात कीस, मिरच्यांचे बारीक तुकडे, तिखट, मीठ टाकावे. मीठ काळजीपुर्वक टाकावे. नेहमीपेक्शा कमी लागते
७. चवीप्रमाणे आले, लसुण वाटुन टाकावी
८.तेल गरम करुन कांदा भजीप्रमाणे करावीत

वाढणी/प्रमाण: 

५/६ जणांकरता सॉस बरोबर

अधिक टिपा: 

बटाट्याचा वाळलेला कीस ही भीजवुन वापरता येतो.

माहितीचा स्रोत: 

मध्यप्रदेश मधे बिलासपुर जवळ एका छोट्या स्टेशनवर पाहीली. फारच खमंग होती. त्यानंतर करुन बघीतली. प्रयोगात असे दिसले कि ह्या प्रमाणे नुडल्स कींवा कुरडईची भजी सुद्धा छान होतात.

 

भरली द्राक्षाची पाने- डोल्मा - चित्र विचित्र

लागणारा वेळ: 

१.५ तास

लागणारे जिन्नस: 

स्टफ्ड पाने हा मेडीटीरीअन मधे लोक प्रिय आहे. ग्रीस मधे डोल्म म्हणुन तो विविध प्रकारे शाकाहारी अथवा मांसाहारी बनवला जातो. ईस्रायल मधे ही हा बराच खाल्ला जातो. ज्यु लोकांकरता हा सुक्कोट ( सुगीचा सण) ह्या सणात बनवला जातो. अमेरीकेमधे थॅक्स गीवींग पद्ध्त ह्यातुन सुरु झाली आहे. ह्या सुमारास द्राक्षाची भरपुर पाने उपलब्ध असतात. ( हल्ली कोल्ड स्टोरेज मधे टीन्ड पण मिळतात)

अर्धी वाटी पाइन नटस .. पर्यायी भोप्ळ्याच्या बिया, चरोळ्या इ [ चाईनीज पाइन नट्स घेउ नयेत. नेस्लेच्य्या संशोधनानुसार त्यामुळे तोंडाची चवच काही दिवस बदलते]
२ वाट्या बासमती
कांदे, तीळ वाटुन, पुदिना , लेमन ज्युस, मीठ, मिरपुड [ सर्व चवीनुसार]
२ कप भाताची पेज / व्हेज सुप [ मला स्वतःला रस्सम फार बरे वाटते]
अर्धा कप ऑलिव्ह ऑइल [ मेडीटेरीअन चवीला पाहीजेच.]

क्रमवार पाककृती: 

१. नट्स कढइत भाजुन घ्या
२. ऑलीव्ह ऑइल मधे कांदा परता
३. बासमती त्यात टाकुन २ मि. परता
४.पेज, सुप, रस्सम त्यात घाला
५. परतत भात अर्धवट शिजवा. रस्सम्/सुप त्यात मुरेल असेच टाका [ भात पुर्ण शिजवु नये ]

६. भात उतर्वुन त्यात नट्स, लींबचा रस, तीळ , पुदीना , मीठ, मीरपुड चवीप्रमाणे टाका.
७. भात थंड होउदेत [फ्रीज नाही]

८. मीठाच्या उकळत्या पाण्यात द्राक्शाची पाने ठेवुन मउ करा
९. पानांची डेखे आणी शिरा काढा
१०. खाली दाखवल्याप्रमाणे पानात राइस स्ट्फ करा

११.पानांचे रोल्स पॅन मधे लावुन घ्या. सुटत नाहीत. पण जर भीती वाटत असेल तर रोल वर दोरा बांधायला हरकत नाही
१२. पेज, रस्सम, ऑलीव्ह ऑइल, लेमन ज्युस पानांवर ओता.
१३. मंद उष्णतेवर ४०/५० मि शिजवा. कुठल्याही परीस्थीतीत उकळु देउ नका.
१४. शिजताना वरुन एखादी बशी उलटी ठेवावी. म्हणजे रोल उघडत नाहीत
१५ शिजल्यावर गरम /गार कुठल्याही आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करवी. ताहीनी छान लागतो.
फोटोकरता थांबा

वाढणी/प्रमाण: 

४/५ जणांकरता

अधिक टिपा: 

पानांसकट खायचे असतात.
होलिश्केस ह्या पदार्थात द्राक्श पाना ऐवजी पान कोबी ची पाने वापरतात. प्ण चवीत फार फरक पडतो.

माहितीचा स्रोत: 

प्रथम ईस्रायल मधे एका किबुत्झ मधे. नंतर ईस्त्रायलमधेच एका ग्रुहीणी कडुन शिकलॉ. आता अधुन मधुन करतो.