Sunday, February 22, 2015


भरली द्राक्षाची पाने- डोल्मा - चित्र विचित्र

लागणारा वेळ: 

१.५ तास

लागणारे जिन्नस: 

स्टफ्ड पाने हा मेडीटीरीअन मधे लोक प्रिय आहे. ग्रीस मधे डोल्म म्हणुन तो विविध प्रकारे शाकाहारी अथवा मांसाहारी बनवला जातो. ईस्रायल मधे ही हा बराच खाल्ला जातो. ज्यु लोकांकरता हा सुक्कोट ( सुगीचा सण) ह्या सणात बनवला जातो. अमेरीकेमधे थॅक्स गीवींग पद्ध्त ह्यातुन सुरु झाली आहे. ह्या सुमारास द्राक्षाची भरपुर पाने उपलब्ध असतात. ( हल्ली कोल्ड स्टोरेज मधे टीन्ड पण मिळतात)

अर्धी वाटी पाइन नटस .. पर्यायी भोप्ळ्याच्या बिया, चरोळ्या इ [ चाईनीज पाइन नट्स घेउ नयेत. नेस्लेच्य्या संशोधनानुसार त्यामुळे तोंडाची चवच काही दिवस बदलते]
२ वाट्या बासमती
कांदे, तीळ वाटुन, पुदिना , लेमन ज्युस, मीठ, मिरपुड [ सर्व चवीनुसार]
२ कप भाताची पेज / व्हेज सुप [ मला स्वतःला रस्सम फार बरे वाटते]
अर्धा कप ऑलिव्ह ऑइल [ मेडीटेरीअन चवीला पाहीजेच.]

क्रमवार पाककृती: 

१. नट्स कढइत भाजुन घ्या
२. ऑलीव्ह ऑइल मधे कांदा परता
३. बासमती त्यात टाकुन २ मि. परता
४.पेज, सुप, रस्सम त्यात घाला
५. परतत भात अर्धवट शिजवा. रस्सम्/सुप त्यात मुरेल असेच टाका [ भात पुर्ण शिजवु नये ]

६. भात उतर्वुन त्यात नट्स, लींबचा रस, तीळ , पुदीना , मीठ, मीरपुड चवीप्रमाणे टाका.
७. भात थंड होउदेत [फ्रीज नाही]

८. मीठाच्या उकळत्या पाण्यात द्राक्शाची पाने ठेवुन मउ करा
९. पानांची डेखे आणी शिरा काढा
१०. खाली दाखवल्याप्रमाणे पानात राइस स्ट्फ करा

११.पानांचे रोल्स पॅन मधे लावुन घ्या. सुटत नाहीत. पण जर भीती वाटत असेल तर रोल वर दोरा बांधायला हरकत नाही
१२. पेज, रस्सम, ऑलीव्ह ऑइल, लेमन ज्युस पानांवर ओता.
१३. मंद उष्णतेवर ४०/५० मि शिजवा. कुठल्याही परीस्थीतीत उकळु देउ नका.
१४. शिजताना वरुन एखादी बशी उलटी ठेवावी. म्हणजे रोल उघडत नाहीत
१५ शिजल्यावर गरम /गार कुठल्याही आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करवी. ताहीनी छान लागतो.
फोटोकरता थांबा

वाढणी/प्रमाण: 

४/५ जणांकरता

अधिक टिपा: 

पानांसकट खायचे असतात.
होलिश्केस ह्या पदार्थात द्राक्श पाना ऐवजी पान कोबी ची पाने वापरतात. प्ण चवीत फार फरक पडतो.

माहितीचा स्रोत: 

प्रथम ईस्रायल मधे एका किबुत्झ मधे. नंतर ईस्त्रायलमधेच एका ग्रुहीणी कडुन शिकलॉ. आता अधुन मधुन करतो.


 

 

No comments:

Post a Comment